राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या घोषणेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या ( NCP) सर्व नेत्यांनी विनंती केली. (NCP President Sharad Pawar announced about retirement )
Uorfi Javed | उर्फी जावेदचा नवीन कारनामा पाहून डोकं चक्रावेल; पाहा Video
त्याचबरोबर शरद पवारांच्या या निर्ययांनतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील याला विरोध केला आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी स्वतःच्या रक्ताने पत्रच लिहिले. सध्या हे रक्ताने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. भूषण चंद्रकांत बागल असे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
धक्कादायक घटना! एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
दरम्यान, शरद पवारांनी अजित पवारांकडे कार्यकर्ते व नेत्यांसाठी निरोप दिला आहे. तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस वेळ द्या. असं शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असं सुद्धा शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Sharad Pawar । शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांची बहीण भावुक…