Sharad Pawar । मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना विधीमंडळाने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केलीय. याचबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील 8 आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता लवकरच शरद पवार गट यावर उत्तर देणार असल्याची माहिती मिळत आहे.
विधीमंडळाने आत्तापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर आता विधीमंडळाकडून अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, राजेश टोपे, सुनिल भुसारा, बाळासाहेब पाटील, सुमन पाटील, संदीप क्षिरसागर या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या पाठवण्यात आलेल्या नोटीसला आमदार काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.