Chandrasekhar Bawankule: शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये – चंद्रशेखर बावनकुळे

Sharad Pawar should not follow the footsteps of Narendra Modi - Chandrasekhar Bawankule

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी झाल्या तरी काही फरक पडणार नाही. मोदीजींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठं आहे. त्यांना 150 देशांमध्ये लोकप्रियता मिळालीये. मोदींना संपूर्ण जग विश्वगुरू म्हणून बघते. तुम्ही अशा नेत्याची बरोबरी कधीच करू शकत नाही. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसाधावल्या स्वप्न बघायला लागलेत, अशी जोरदार टीका बावनकुळेंनी शरद पवारांवर केली आहे.

Income Tax Department: राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’प्रकरणी आयकर विभागाचे महाराष्ट्रासह देशभरात छापे

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत”. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीवर देखील त्यांनी टीका केली आहे .”भारतीय जनता पार्टीच्या कृपेने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडं उद्धव ठाकरेंनी देखील दगाबाजी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची योग्य जागा दाखवून देणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले”.

दूध उत्पादन करताय? तर मग ‘या’ 4 जातींच्या म्हशी ठरत आहेत फायदेशीर? वाचा सविस्तर

येणाऱ्या महापालिका निवडणुका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. संपूर्ण राज्यभर आमचेच महापौर असणार आहेत. कोणतीही निवडणूक येउद्या नंबर आमच्याच पक्षाचा असणार आहे. महाविकास आघाडी सरकारचा पराभव करत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *