Sharad Pawar । पुणे : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. यंदा नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जहरी टीका केली. (Latest marathi news)
Lok Sabha Election । मतदारांसाठी शानदार ऑफर! ‘…. तर हॉटेलमध्ये मिळणार डिस्काउंट’
“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन पक्ष फोडून आले. ते त्यांचं कर्तृत्व सांगत आहे. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाही तर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “काही जण दमदाटी करत आहेत. पण त्यांना हे माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. सुदैवाने आज बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आपण नक्कीच जास्त जागा जिंकू. काही जणांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले आहेत. यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.