Sharad Pawar । एकीकडे कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तर दुसरीकडे कांद्यावरून राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सातत्याने कांद्याच्या हमीभावाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. अनेक बड्या नेत्यांनी कांद्याला चांगला हमीभाव द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी देखील कांद्याला चार हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Onion Rate)
Political News । प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
याबाबत बोलताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, शरद पवार महाराष्ट्राचे कृषिमंत्री देखील होते त्यामुळे माझा त्यांना प्रश्न आहे की, ते कृषिमंत्री असताना शेतकरी एवढ्या वेळा अडचणीत आले त्यांनी लोकांना काय दिलं? किती मदत दिली? आम्ही अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली ही आजपर्यंतची सर्वात मोठी मदत आहे. त्यामुळे तुम्ही आधी तपासून घ्याव आपण सत्तेत असताना काय मदत केली आहे. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News )
त्याचबरोबर पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, 18 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतलाय. यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याने पुढच्या वर्षी कांद्याचा तुटवडा होऊ शकतो म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. असे देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.
Agriculture News | कोथिंबीरीला भाव नसल्याने शेतकऱ्यानं एक एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटर
सरसकट कांदा घेणे शक्य नाही
त्याचबरोबर गिरीश महाजन म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व्यापारी तसेच शेतकरी यांच्यामध्ये मंगळवारी किंवा बुधवारी एकत्रित बैठक होईल त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते ऐकून घेतले जाईल जातील. नाफेडच काम हे कांदा साठवणे आणि भाव वाढल्यास त्या ठिकाणी पाठवणे आहे. मात्र सरसकट कांदा घेणे शक्य नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
Onion Rate । शेतकऱ्यांना मोठा फटका! निर्यात शुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण