राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांत हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. दरम्यान २ मे रोजीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
मोठी बातमी! यूट्यूबला कंटेंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) ही घोषणा होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्त होऊ नये यासाठी भावनिक आवाहन केले आहे. याच सर्व गोष्टीचा विचार करून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक अलर्ट, गिरीश बापट यांच्या जागी कोण? राजकीय पक्षांची धांदल सुरू होणार
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदचे वातावरण पाहायला मिळत आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली.