राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांत हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. दरम्यान २ मे रोजीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
Electric Scooters | ‘या’ इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमतीत झाली कपात; करून घ्या संधीच सोनं!
लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) ही घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्त होऊ नये यासाठी भावनिक आवाहन केले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग! 11 मे नंतर नवीन सरकार स्थापन होणार? कायदेतज्ञांच्या ‘त्या’ ट्विटने उडाली राजकारणात खळबळ