
मुंबई : रायगड जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवलं आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही”, असं वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतील अशीच चर्चा सगळीकडे सुरू आहे.
शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेससोबत युती करत स्थापन केले होते. अनेकवेळा गोगावले यांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव मिळतो अशी तक्रार केली होती. यानंतर शिवसेनेतील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन बंडखोरी करत भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले.
यावरूनच गोगावले म्हणालेले आहेत की, “शिवसेनेने भाजपासोबत युती केली असती तर पाच पावले मागे आलो असतो”. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला असून यामध्ये भरत गोगावले यांना कोणतेच मंत्रीपद मिळाले नाही यामुळे ते नाराज असल्याचीच चर्चा सगळीकडे सुरू होती. पण भरत गोगावले यांनी याबाबत आपले स्पष्टीकरण देत नाराज नसल्याचे सांगितलेले आहे.