भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट ( Girish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले. सर्व पक्षांमधील नेत्यांशी चांगले हितसंबंध ठेऊन असणाऱ्या नेत्यांमधील ते एक नेते होते. त्यामुळे गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात गिरीश बापट यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित राहून गिरीश बापट यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट देखील केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा; म्हणाले, “अजित दादा जिकडे जाणार तिकडे…”
श्रद्धांजली सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी गिरीश बापट यांच्यासोबतची एक आठवण सांगितली आहे. गिरीश बापट आजारी असताना शरद पवार त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी आत्मविश्वासाने शरद पवारांना सांगितले होते की, मी या आजारावर मात करणार. यावर शरद पवार म्हणाले होते की, तुम्हाला जो आजार आहे तोच आजार मला देखील आहे. २००४ मध्ये मला डॉक्टरांनी फक्त ६ महिने दिले होते.
त्यावेळी डॉक्टर म्हणाले होते की या सहा महिन्यांत काही करायचे असेल तर करून घ्या. तेव्हा मी त्या तरुण डॉक्टरांना म्हणालो होतो की, काळजी करू नका मी पुन्हा तुम्हाला पोसायला येईल. २००४ नंतर आज २०२३ उजाडले आहे. मी मात्र अजूनही जागेवर आहे. असा विश्वास शरद पवारांनी त्यावेळी गिरीश बापट यांना दिला होता. त्यावेळी गिरीश बापटांनी सुद्धा ‘या आजाराला भक्कमपणे तोंड देईल’ असा शब्द शरद पवारांना दिला होता. मात्र यामध्ये गिरीश बापट यांना यश आले नाही. अशी खंत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
अजित पवार पुण्यातील दौरा रद्द करून गायब! राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता; चर्चांना उधाण