Sharad Pawar-Uddhav Thackeray । काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या बैठकीबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे, याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली असून, त्यामुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. त्याचबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चर्चा झाली आहे. (Sharad Pawar-Uddhav Thackeray)
Viral News । लग्नानंतर काही दिवसातच पतीला समजले पत्नीचे भयानक रूप!
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, ठाकरे आणि पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ही बैठक झाली आणि ती सुमारे दीड तास चालली. ते म्हणाले, “काँग्रेसचे नेते पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्यावर विरोधकांनी घ्यायची भूमिका यावर उद्धवजी आणि पवार साहेबांनी चर्चा केली. असं राऊत म्हणाले आहेत.
Rohit Pawar । मॅक्सवेलचं द्विशतक अन् शरद पवारांचा ‘तो’ फोटो, रोहित पवार यांनी केले ट्विट
निवडणूक रणनीती आणि जागावाटपावर चर्चा
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्या तर त्यावेळी विरोधकांची रणनीती काय असावी आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली. अंतिम बैठक दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Manoj Jarange Patil । मराठा समाजाचं जास्त वाटोळं मराठा नेत्यांनीच केलं – मनोज जरांगे पाटील