
Sharad Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) सोबत बंडखोरी करत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी मधील अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. यानंतर काही आमदार शरद पवार गटात (Sharad Pawar group) राहिले तर काही आमदार अजित पवार गटात गेले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटातील इन्कमिंग चालू झाली. सध्या देखील अजित पवार गटात सांगलीतील दोन बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे.
त्याचबरोबर येत्या महिनाभरात अनेक नेते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. वैभव पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या सांगली जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Manoj Jarange Patil । “…तर तुडवायला वेळ लागणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा नेत्यांना गंभीर इशारा
सांगली या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शहर जिल्हा अध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील बोलत होते. यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.