राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांत हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
काल ( ता.२) लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) ही घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्त होऊ नये यासाठी भावनिक आवाहन केले आहे.
आता शरद पवार निवृत्त झाले तर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये तीन नावे प्रमुख आहेत. पहिले नाव सुप्रिया सुळे यांचे आहे, दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर जयंत पाटील आहेत. जयंत पाटील हे अनेक वर्षे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे नाव देखील या पदासाठी चर्चेत आहे.
Uorfi Javed | उर्फी जावेदचा नवीन कारनामा पाहून डोकं चक्रावेल; पाहा Video