NCP MLA Disqualification । मागील वर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सर्वात मोठी फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षात फूट पडूनही आजही अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सहभागी होत आहेत. खरी राष्ट्रवादी कोणाची? यावर अजून निर्णय झाला नाही. परंतु, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांची एक चूक खूप महागात पडण्याची शक्यता आहे. (NCP MLA Disqualification case)
आज प्रथमच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना एक प्रश्न विचारला असता त्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणी एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न विचारताच त्यांनी “पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. पण confidential कपाटात हे कागदपत्र ठेवले होते. जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते हरवली. संबंधित माणसं पक्ष सोडून गेली असून त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही”, असं मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावरून आता पक्ष शरद पवारांच्या हातून जातो की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
NCP MLA Disqualification | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट