मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. आता यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
“…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर इशारा
शरद पवार म्हणाले, “येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्व लोकांना बेळगावामधील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवरअसला प्रकार जर घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे”. असं शरद पवार म्हणाले आहेत. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जनावरांना मिळणार अवघ्या 300 रुपयांत विमा; वाचा सविस्तर माहिती
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांना कर्नाटकमध्ये जायची वेळ येणार नाही. या घटनांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही तर…”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला गंभीर इशारा