Sharad Pawar । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) धामधूम सुरु आहे. काही ठिकाणी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. महावीकास आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये काही ठिकाणी उमेदवारीचा पेच कायम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचं अद्याप जागावाटप देखील पूर्ण झालं नसून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होणं बाकी आहे.
Bacchu Kadu । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! बच्चू कडू यांनी दिला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा
सध्या देखील एक महत्वाची बातमी समोर अली आहे. माढा लोकसभेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा 12 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवारयामध्ये मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून स्वत: शरद पवार (Sharad Pawar) लोकसभा निवडणूक लढतील, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांचीही तशी भावना आहे. त्याचबरोबर इतरही काही नेत्यांनी शरद पवारांकडे लोकसभेचं तिकीट मागितलं आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.