Sharad Pawar । लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) तोंडावरून येऊन ठेपल्या आहेत तरीदेखील काही ठिकाणी अजूनही उमेदवारांचा पेच कायमच आहे. मागच्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघ देखील खूप चर्चेत आहे. कधी महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे तर कधी महायुतीमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवारांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या नेत्याने बंडाचं निशाण फडकावलं आहे. ते आता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघात अभय जगताप यांच्याऐवजी धैर्यशील मोहित पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. यामुळे अभय जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.
Crime News । थरकाप उडवणारी घटना! ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पतीने केली पत्नीची गळा चिरुन हत्या
या सर्व घडामोडी घडत असताना अभय जगताप यांनी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी बैठकीत सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढवण्याची मागणी केलीय. त्यामुळे जर शरद पवार यांनी उमेवारीबाबत योग्य विचार केला नाही तर अभय जगताप अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांनी याबाबत संवाद देखील साधला आहे.
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; आणखी एक नेता करणार भाजपात प्रवेश