Sharad Pawar । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. जळगावमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचं कारण स्पष्ट केले.
पांडुरंग शिंदे यांनी सांगितले की, “सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती, पण मला ती टीका पटली नाही. सदाभाऊ खोत हे सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून दूर गेले आहेत. त्यांचे कार्य आता व्यक्ती केंद्रीत झाले आहे.” तसेच त्यांनी पक्ष सोडताना, जिल्ह्यातील २५ कार्यकर्ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला.
यावेळी पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर रयत क्रांती सेनेच्या अंतर्गत नाराजी देखील उफाळून आली आहे. शिंदे यांच्या या निर्णयामुळे सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे त्यांचे नेतृत्व आव्हानांच्या समोर उभे आहे.
Bjp । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा झटका