
मुंबई : दरम्यान दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवारांनी केंद्र सरकारवर (Central government) बोचरी टिका केली. तसेच शरद पवार यांनी देशातील विविध घटकांच्या समस्यांचा परामर्श घेतला. यावेळी ते बोलतांना म्हणाले, ‘आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे,ती गोष्ट म्हणजे दिल्ली(delhi) समोर झुकणार नाही.’
देश कोणत्या दिशेने चालला आहे यावरून शरद पवारांनी केंद्रीय सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. देशातील बळीराजावर झालेला अन्याय, अत्याचार, तरूणांवर ओढवलेले बेरोजगारीचे संकट, महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली तसेच पवार यांनी पक्षातर्फे याबाबत एक ठोस कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असे आवाहान केले.
तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडे यंदा देण्यात आली आहे. तसेच विविध राज्यातील युवा प्रतिनिधींना अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवार यांनी देशभरातून अधिवेशनासाठी आलेल्या या सर्व युवा पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
Dadar: दादरमध्ये शिवसेना विरुद्ध शिंदे गटात राडा, गोळीबारात एक पोलीस जखमी