Sharad Pawar । शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का! ‘त्या’ 137 पदाधिकाऱ्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम त्यांना आगामी निवडणुकीत पाहायला मिळेल. (Latest marathi news)

Sharad Pawar । “…तर कोणालाच सोडणार नाही”, शरद पवार यांचा गंभीर इशारा

लोणवळ्यामध्ये अजित पवार गटातील काही दिवसांपूर्वी 137 जणांनी राजीनामा दिला होता. आता या 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लोणावळ्यामध्ये अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असे बोलले जात आहे. याचा फायदा शरद पवार गटाला आगामी काळात होईल.

Ajit Pawar । अजित पवार गटाने वाढवले भाजपचे टेन्शन!

दरम्यान, यावरून लोणावळ्यात अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. ही नाराजी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने व्यक्त करण्यात आली आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. पण या आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिल्याने पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला अशीही माहिती समोर आली आहे.

Viral Video । रस्त्याच्या मधोमध तरुणीचा अश्लील डान्स, लोकांनी व्यक्त केला संताप; पाहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love