Sharad Pawar । लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घटना पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने ते दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. अशातच आता खासदार शरद पवार यांनी एक मोठं भाकीत केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचे पहायला मिळत आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. (Latest marathi news)
BJP । भाजपचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश
“येत्या काळात पक्षात इनकमिंग आणखी झालेलं दिसेल. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त होईल. महायुतीचं संपूर्ण जागा वाटप झालं आणि त्यात जर इच्छुक उमेदवारांना संधी मिळाली नाही तर हे लोक दुसऱ्या पक्षात संधी शोधत असतात. यानुसार आता अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येतील,” असा मोठा दावा शरद पवारांनी केला आहे.
तसेच शरद पवार पुढे म्हणाले, “विशेषत: सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना, विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या सूडबुद्धीच्या गैरवापराचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या अटकेवरून भाजपची सत्ता कोणत्या मर्यादेपर्यंत जाईल हे दिसून येते.” अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात आम्ही एकजूट आहोत.