Sharad Pawar । महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. काल इंदापुरमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठा खुलासा केला आहे. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली होती.कोणाला मंत्रीपद द्यायचं हे देखील ठरलं होत,” असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. यावर खासदार शरद पवारांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Latest marathi news)
Viral । “आधी किस केलं अन् मग…”, दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले एकदम अश्लील कृत्य; पाहा Video
“भाजपसाोबत (BJP) जाण्यासाठी आमची कधीच सहमती नव्हती आणि (यापुढेही) राहणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शरद पवार हे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळुन लावला आहे. पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने काका-पुतण्या पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
बारामती मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे.
Odisha News । भयानक दुर्घटना! ५० लोकांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली; अनेकजण बेपत्ता