
मागील काही दिवसांपासून देशांमध्ये लव जिहादची (love jihad) बरीच प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना (Sharad Pawar) लव जिहाद विषयी प्रश्न विचारल्यास त्यांनी त्यांचं रोखठोक मत मांडले आहे. आपल्या भारत देशात आणि राज्यांमध्ये अनेक लोकांचे वेगवेगळे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये इतर प्रश्न घुसडून उगाच त्या प्रश्नांना प्रसिद्धी दिली जात आहे. असं परखड मत शरद पवारांनी मांडले आहे.
ब्रेकिंग! भंगार गोदामाला भीषण आग; नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु…
त्याचबरोबर शरद पवार म्हणाले आहेत की, महाविकास आघाडी अजूनही मजबूत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. देशात सध्या जो ट्रेंड चालू आहे तो भाजपविरोधी (BJP) आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर भाजपची सत्ता कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे याचे उत्तर समोर येईल.
केरळमध्ये भाजप नाही. त्याचबरोबर तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये देखील भाजपची सत्ता उरली नाही. गोव्यात त्यांची सत्ता कशी आली याची आपल्याला जाणीव आहे. आमदार फोडून त्यांनी हे राज्य बळकावलं. महाराष्ट्रात देखील त्यांनी तसंच केलं. असं शरद पवार म्हणाले आहेत. 2024 मध्ये लोकांचा कौल भाजपाच्या बाजूने जाईल याचे खूप कमी संकेत आहेत. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही लोकांनी ते आपल्या कृत्यातून दाखवून दिलं आहे.
नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून कडाक्याचं भांडण; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल
देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये आता भाजप उरला नाही. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा शरद पवारांना लव जिहाद बद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस ते म्हणाले की, “लव्ह जिहादपेक्षा मोठ-मोठे प्रश्न आहेत. विनाकारण समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अशा प्रकरणांना मीडियाने देखील जास्त प्रसिद्धी देऊ नये”. असं शरद पवार म्हणाले आहेत. देशातील अल्पसंख्याकांना (मुस्लिम व ख्रिश्चन) संरक्षण देण्याची गरज आहे. आदिवासी तसेच दलित समाजाचे संरक्षण करणे हे देखील सरकारचे काम आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.