राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “भारताच्या पंतप्रधानांची जगात किंमत वाढली याचा आम्हाला आनंद आहे. परंतु, आमची द्राक्षे बांगलादेश सुद्धा घेत नाही. हीच आमची खरी किंमत.” असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदी ( Naredra Modi) यांना टोला मारला आहे.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच भाजपने दिली खुली ऑफर!
नाशिक मधील कादवा सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शरद पवार काल ( ता.10) उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, भारताची द्राक्षे परदेशात जातात. बांगलादेश, युरोप आणि अनेक भागांत ती निर्यात होतात. परंतु, महाराष्ट्राइतक्या असलेल्या बांगलादेशने कोणतीतरी ड्युटी लावली आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली द्राक्ष तिथे गेली नाही. माझ्याकडे पत्र आहे.
अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सणसणीत टीका; म्हणाले, “हे निर्णयशून्य सरकार….”
बांगलादेशने लावलेली ड्युटी कमी करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी देशाच्या राज्यकर्त्यांकडे जाऊन केली. परंतु यावर काही निकाल लागत नाही. पार्लमेंटमध्ये विरोधकांनी यावरून पंतप्रधानांवर टीका केली. सध्या आजूबाजूच्या देशांत घडणाऱ्या गोष्टींची किंमत देशाला, देशातील शेतकऱ्याला मोजावी लागत आहे. सत्ताधाऱ्यांची भाषणं मी ऐकली आहेत. त्यामुळे जगामध्ये आमची किंमत वाढली व त्याबाबत आनंद आहे. हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची किंमत जगात वाढली याचाही मला आनंद आहे.
राहुल कलाटे यांना बंडखोरी पडणार महागात! शिवसेनेतून हाकलपट्टी होण्याचे संकेत
मात्र जगात किंमत वाढली आणि आमची द्राक्ष बांगलादेश सुद्धा घेत नाही. हीच आमची किंमत ! याचा अर्थ असा की आम्ही स्वतःची प्रतिष्ठा महत्वाची समजतो. घाम गाळणाऱ्यांची प्रतिष्ठा आहे. त्यासाठी सत्तेचा उपयोग केला जात नाही. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. असे मत शरद पवार ( Sharad Pawar) यांनी यावेळी मांडले.
उद्धव ठाकरेंनी सांगून देखील राहुल कलाटे मागे हटत नाहीत; चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत