राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या घोषणेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
IPL | ‘त्या’ वादाचा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना मोठा फटका! मॅच फी मध्ये होणार कपात
मध्यंतरी ‘भाकरी फिरवायची वेळ आली आहे’ असं म्हणत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र नेतृत्व बदलण्यासाठी शरद पवार स्वतःच निवृत्ती घेतील, असे कोणालाच वाटले न्हवते. दरम्यान शरद पवारांनी हा निर्णय ‘का’ घेतला असेल ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर याबाबत काही तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
mobile । रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवताय तर सावधान! ‘हे’ आहेत धोके..
पवारांच्या राजीनाम्यानंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या समर्थकांचा कल सकाळ वृत्तसमूहाने समजून घेतलाय. यामध्ये लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले यामध्ये ‘अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा मोठा निर्णय घेतला का? या प्रश्नावर ४१ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला नाही. असे स्पष्ट होतय.