महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांनी ( Sharad Pawar) अदानी प्रकरणात भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकिय भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ( NCP) मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बाबरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “त्यावेळी सगळे उंदीर…”
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रद्द केली आहे. ४ राज्यांत ६ टक्के मते मिळायला हवीत. महाराष्ट्र, नागालँड आणि अंदमान-निकोबारमध्ये तेवढी मते पक्षाला आहेत. पण, अंदमान-निकोबारची मते आयोगाने ग्राह्य धरली नाहीत,” अस शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले आहे.
संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना देखील दिले आव्हान
दरम्यान, राष्ट्रवादी सोबत ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस व सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी याबाबत घोषणा केली. यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व सीपीआय हे तिन्ही पक्ष फक्त प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.