Site icon e लोकहित | Marathi News

कर्नाटक वादावर शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Sharad Pawar's first reaction on the Karnataka dispute; said…

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. आता यावर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

50 गुंठ्यात 120 टन ऊसाचे उत्पादन काढून शेतकऱ्याचा विक्रम; वाचा सविस्तर

शरद पवार म्हणाले, आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. बेळगावमध्ये आज जे काही घडलं ते निषेधार्ह आहे. मागच्या आठवड्यापासून हे प्रकरण वेगळ्या स्वरुपात पुढं करण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी २० नोव्हेंबरला जतबाबत भूमिका मांडली. नंतर २४ नोव्हेंबर रोजी अक्कलकोटबाबत भूमिका मांडली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असं देखील म्हटलं.

बाई नाचली, डोकी फुटली; पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा

दरम्यान, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यामुळे तेथील टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आहेत. त्यांना पोलिसांनी त्यांना हा दौरा करण्यास मनाई केली होती तरी देखील ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी संतापलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.

बिग ब्रेकिंग! बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक

Spread the love
Exit mobile version