महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. सध्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ते चर्चेत आहेत. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नव्या युगाचे हिरो असल्याचे भगतसिंग कोश्यारी होते. त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध होत आहे. यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया देखील येत आहेत. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! आता न्यायालयच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची हकालपट्टी करणार?
आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाची बातमी! बारामतीतून वैदयकीय कॉलेज महिला रुग्णालयासाठी बससेवा सुरु
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “जबाबदार पदावर बसून राज्यपाल कायम विधान करत आहेत यामुळे याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी दखल घेतली पाहिजे. त्याचबरोबर निकाल लावाला पाहिजे असे देखील पवार यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर धरने आंदोलन