कोल्हापुरात (Kolhapur) शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. (Latest Marathi News) समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी काल कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता शरद पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
WTC मॅचच्या पहिल्याच दिवशी ‘हे’ बडे प्लेयर भिडले! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुरात मोबाईलवर कोणीतरी चुकीचा मेसेज पाठवला, हे चुकीचे आहे. मात्र त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून, त्याला धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही.
मुंबईच्या वसतिगृहातील तरुणीसोबत घडलेल्या प्रकराबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मात्र राज्यकर्तेच रस्त्यावर उतरत आहेत. राज्यकर्त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरत आहेत. दोन समाजामध्ये कटूता निर्माण होत आहे, हे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलं.
कोल्हापूरच्या घटनेवर ठाकरे गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधी पक्ष कधीही मागे…”