Sharad Pawar । पुणे : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) तयारी सुरु आहे. अशातच आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayantrao Patil) यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. (Loksabha election 2024)
Crime News । गोंदिया हादरलं! आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या, पाच दिवसानंतरही पोलिसांच्या हाती…
या जाहीरनाम्यात महिला, तरुण, तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावासह शाळांचा सेफ्टी ऑडिटसारख्या अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. यावेळी शरद पवार यांनी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. “गेल्या दहा वर्षात शेती संबधीचे प्रश्न वाढले असून या दरम्यान अमित शहा (Amit Shah) यांच्या हा पक्षाकडे होता. या दरम्यान त्यांनी काय केलं ते सांगावे,” असा सवाल शरद पवार यांनी केला.
“शरद पवार कृषीमंत्री असताना आत्महत्या पाहून मनमोहन सिंग यांना विदर्भात आणून कर्जमाफी करायला सांगितली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मागणी केली त्याचा आनंद आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून त्यावर अमित शहांकडे काय उत्तर आहे?”, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.