राज्यातील राजकिय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचे मेतकूट जमत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अदानी प्रकरणात शरद पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध करत भाजपला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत मवाळ भूमिकेत दिसत आहे. एवढेच नाही तर NCP च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आपला आवडता पंतप्रधान म्हंटले होते.
श्रद्धा वालकर प्रकरणात समोर आली मोठी अपडेट, वडील गंभीर आरोप करत म्हणाले…
मात्र शरद पवारांनी ( Sharad Pawar) आपली भाजपसोबतची भूमिका नुकतीच स्पष्ट केली आहे. भविष्यात कोणाकडून काय निर्णय घेतले जातील माहिती नाही, परंतु सध्या तरी महाविकास आघाडी एकत्र आहे. असे शरद पवार नुकत्याच झालेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अगामी लोकसभा निवडणुक २०२४ अगदी जवळ आली आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांचे जागा वाटप अजूनही झालेले नाही. यावर बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की, आघाडीच्या राजकारणात जागा वाटप सहजपणे होत नाही. त्यामध्ये भरपूर दावे होतात. परंतु, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील आणि लवकरच जागा वाटप होईल.
बाबरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “त्यावेळी सगळे उंदीर…”
याशिवाय राजकारणात सध्या उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात फडतूस काडतूस शब्दावरून वाद सुरू आहे. या वादावरून देखील शरद पवारांनी मुलाखती दरम्यान आपले मत व्यक्त केले आहे. कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीकाटिपण्णी करू नका. असे शरद पवार म्हणाले आहेत.
संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना देखील दिले आव्हान