काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षातील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध झाला. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा मागे घेतला. अशातच त्यांनी पक्षासाठी दोन कार्यकारी अध्यक्षांची निवड केली आहे.
Ajit Pawar। नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले, “आता स्टॅम्प पेपरवर लिहून…”
काल राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल (Supriya Sule and Praful Patel) यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्याचे कारणे शरद पवारांनी सांगितले. दिल्लीत पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी या मागची भूमिका सांगितली. ते म्हणाले, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्षाचे काम कसं वाढवता येईल? याबाबत चर्चा सुरू होती. आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात यायला हव्या, असं ठरलं. पक्ष्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करून या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अपघात की घातपात? समोर आली धक्कादायक माहिती
महाराष्ट्रशिवाय इतर राज्यात पक्षाची ताकद वाढावी, यासाठी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यकारी अध्यक्ष नेमले आहेत. याबाबत पुढील महिन्यात बैठक बोलावणार आहे. त्यांच्यावर कार्यकारी अध्यक्षांसह विविध राज्यांची जबाबदारी ही सोपवली आहे, असे शरद पवार म्हटले.
शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; ट्विट करून सांगितली मोठी गोष्ट
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षासह इतर राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आदी राज्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आदी राजांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
“देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही…“, पाकिस्तानच्या ‘या’ बड्या प्लेयरची राहुल द्रविडवर टीका