Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेचा घेतला फडणवीसांनी खरपूस समाचार, म्हणाले; ‘त्यावेळी मी..

Fadanvis

राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांचे वाचन कमी असावे, अशी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर देत मी त्यावेळी 1978 मध्ये प्राथमिक शाळेत शिकत होतो, असा टोला हाणला आहे. (Marathi Latest News)

‘केसीआर यांच्या दौऱ्यामागे राजकीय कारस्थान’, ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

“शरद पवार जे काही म्हणाले ते अगदी खरं आहे. कारण मी त्यावेळी 1977 मध्ये प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर शरद पवार यांनी नीट ऐकलं नाही किंवा त्यांनी जे ऐकलं त्यामुळे ते अस्वस्थ झाले, त्यामुळे त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही शरद पवार यांनी बेईमानी केली, असे म्हणालो नाही. उलट ते भाजपसोबत (BJP) आले आहेत हे मीच सांगितलं”, असे फडणवीस म्हणाले आहेत.

लग्नानंतर पत्नीला शिक्षण दिले, अधिकारी बनवले; पण पत्नीने पतीसोबत केले असे काही कृत्य की वाचून तुम्हीही हादराल

पुढे ते म्हणाले की,’ कोण कधी जन्माला यावर इतिहास बदलत नाही. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वात 40 जणांनी वसंत दादा पाटील यांचे सरकार पडले होते. त्यांनी बाहेर पडत तेव्हाचा जनसंघ म्हणजे आताच्या भाजपसोबत त्यांनी सरकार तयार केले होते. हेच मी सांगितलं”, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.

बजेट ठेवा तयार! बाजारात ‘या’ दिवशी धुमाकूळ घालणार 5-डोर Mahindra Thar, किंमत असणार फक्त..

Spread the love
Exit mobile version