Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार! अत्यंत जवळचा नेता अजित पवारांच्या संपर्कात

Sharad Pawar And Ajit Pawar

Sharad Pawar । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक बडे नेते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. यामध्येच आता जयंत पाटीलच वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळ जनक दावा अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम (Food and Drug Administration Minister Dharmarao Baba Atram) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Supriya Sule । राजकीय घडामोडींना वेग! बारामतीतून सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार देणार टक्कर? त्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

खरी राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये देखील आमदार अपात्रता मुद्दा प्रलंबित आहे. यामध्येच एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. अजित पवार गटाचे १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडण्याच्या चर्चा सुरू होत्या.

Urfi Javed । उर्फी जावेदला मोठी दुखापत! ‘त्या’ फोटोमुळे चाहते हैराण

मात्र धर्मरावबाबा आत्राम यांनी जयंत पाटील हे आमच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनील तटकरे यांनी देखील आत्राम यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे तर अजूनच चर्चांना उधाण आले आहे.

Dhangar Reservation । “..त्यामुळे शरद पवार यांनी धनगर आरक्षणाला केला विरोध”; पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

Spread the love