Share Market । इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे शेअर मार्केटमध्ये स्थिती बिघडली, Stock विकायचे की ठेवायचे?

Share Market

Share Market । इस्रायल आणि इराण यांच्यातील ताज्या संघर्षामुळे जागतिक शेअर मार्केटमध्ये अस्थिरता वाढली आहे. या संघर्षामुळे अनेक बाजारपेठांवर दबाव वाढत असून, गुंतवणूकदारांसमोर विक्री किंवा शेअर्स ठेवण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. सेबीच्या महत्त्वपूर्ण निर्णयांनंतर गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात (Market) अस्थिरतेची लहर आली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. (Instability)

Ajit Pawar । “आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे”- अजित पवार

तज्ज्ञ अनुज सिंघल यांनी याबाबत चर्चा करताना सांगितले की, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी धैर्याने निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की, इतिहास दर्शवतो की जिओ पॉलिटिकल इम्पॅक्टच्या काळात शेअर मार्केट कमी होत असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या वेळी खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. ते चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देतात आणि पॅनिकमध्ये विक्री करण्यास टाळण्याचे आवाहन करतात. (Investment Stocks)

Bjp । निवडणुकीआधी भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

सिंघल यांच्या मते, मेटल शेअर्सवर विशेष लक्ष केंद्रित करणे योग्य ठरू शकते, कारण या क्षेत्रात सध्या सकारात्मक स्थिती दिसत आहे. त्याचप्रमाणे, क्रूड ऑईल आणि पेट्रोल कंपन्यांचे शेअर्सही थोड्या प्रमाणात तेजीत असल्याचे आढळले आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक निर्णय घेणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून आर्थिक स्थिरता साधता येईल.

Pune Crime । पुणे हादरले! स्कुल बसच्या ड्रायव्हरकडून बसमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार

Spread the love