
लग्नसराईमध्ये अनेक लोकांना रोजगार मिळतो. याकाळात अनेक महिला लग्न कार्यात कामासाठी सामील होतात. पुण्यातील काही महिला अशाच लग्न कार्यात कामासाठी गेल्या होत्या. मात्र कामावरून परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत असताना या महिलांचा अपघात (Road Accident) झाला आहे. काल ( ता.13) रात्री हा अपघात झाला. यामध्ये पाच महिलांचा महिलांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे.
मोठी बातमी! शिंदे सरकार टिकणार की कोसळणार? सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
त्याच झालं असं की, एका लग्न कार्यात काम करण्यासाठी जवळपास १७ ते १८ महिला स्वारगेटहून पीएमपीएमल बसने खेडला गेल्या होत्या. यावेळी शिरोली फाट्याजवळ या सर्व महिला उतरल्या. मात्र यातील वयस्कर महिला रात्रीच्या वेळी अंधारात मार्ग ओलंडताना चाचपडत होत्या. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या एका कारने आठ महिलांना धडक दिली.
दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते, आज आहे कोट्यवधींचा मालक; वाचा एमसी स्टॅनच्या संघर्षमय जीवनाची कहाणी
या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 5 महिलांचा मृत्यु झाला आहे. उर्वरित 3 जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कारचालक पुण्याच्या ( pune) दिशेने पसार झाला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून कार चालकाचा शोध घेणे सुरु आहे.