Rakhi Sawant । “तिने माझा न्यूड व्हिडीओ तयार केला, ड्रग्ज दिले अन…” आदिल दुर्रानीने केला धक्कादायक खुलासा

"She made my nude video, gave me drugs and…" Adil Durrani made a shocking revelation

Rakhi Sawant । ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर (Social Media) तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Rakhi Sawant Viral Video) होत असतात. विशेष म्हणजे तिला लोकांचं लक्ष वेधून घ्यायला चांगलेच जमते. लक्ष वेधून घेण्यासाठी तिचे उद्योग सुरु असतात. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)

Weather Update । पावसाची पुन्हा हुलकावणी, ‘या’ दिवशी होणार दमदार एन्ट्री

लग्नानंतर काही दिवसांनी राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानीमध्ये (Adil Durrani) मतभेद सुरू झाले. राखीने आदिलवर खूप गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती. नुकताच आता तो तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच त्याने राखीवर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

गिरणी कामगारांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा

“राखी मला ड्रग्स देऊन माझे न्यूड व्हिडीओ तयार करत होती. ज्यावेळी आमची ओळख झाली तेव्हा राखी माझ्यासमोर खूप चांगले राहत होती. मला तिच्याबद्दल कसलीच माहिती नव्हती. परंतु राखी बिग बाॅस मराठीमध्ये गेल्यानंतर मला तिच्याबद्दल काही पुरावे मिळाले, असा आरोप आदिलने केला आहे. त्यावर आता राखी कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Pankaj Tripathi | ब्रेकिंग! पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन

मी लवकरच राखी आणि तिच्यासोबत असणाऱ्या सर्वांचे चेहरे उघड करणार आहे. माझ्यासोबत खूप अन्याय झाला आहे. मी आज ना उद्या पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे, असेही आदिलने स्पष्ट केले आहे.

एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते? काय सांगतो कायदा जाणून घ्या

Spread the love