सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये एक महिला गाडी चालवत असून तिने गाडी चक्क क्रोकरी दुकानात घुसवली आहे. गुजरातमध्ये (Gujrat) वडोदरा येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याने गाडी चालवणाऱ्या महिलेविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
VIDEO: नाणेफेक दरम्यान रोहित शर्माने केली ‘ही’ मोठी घोडचूक
वडोदरातील अलकापुरी भागात क्रोकरी दुकानात खरेदी करण्यासाठी ही महिला आली होती. यावेळी गाडी पार्क करत असताना महिलेकडून गडबड झाली. यावेळी तिने ब्रेक ऐवजी अँक्सिलेटर दाबला. यामुळे गाडी सरळ जाऊन क्रॉकरी स्टोअर मध्ये घुसली. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी पायऱ्या चढून दुकानात घुसली आहे. हा अजब अपघात (Car Accident) पाहून उपस्थित लोकांच्या देखील भुवया उंचावल्या होत्या.
ब्रेकिंग! महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन
दरम्यान ही संपूर्ण घटना क्रॉकरी स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचेच फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल( Viral Video) होत आहे. @Narendra Singh या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणी सुद्धा जखमी झालेले नाही. परंतु क्रॉकरी स्टोअरचे खूप नुकसान झाले आहे. कारच्या या धडकेत दुकानाच्या एका बाजूच्या काचा फुटल्या आहेत. तसेच लाखो रुपये किमतीची क्रॉकरी फुटून गेली आहे. यामुळे दुकानाचे मालक महेशभाई सिंधानी यांनी कार चालवणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘या’ भाजप प्रदेशाध्यक्षाने केला मोठा गौप्स्फोट; म्हणाले, भाजपकडूनच पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट