आपला देश कितीही विकसित झाला असला तरी आजही या देशात महिला सुरक्षित नाहीत. आपल्या आजूबाजूला महिलांच्या बाबतीत सतत बलात्काराच्या किंवा विनयभंगाच्या घटना घडत असतात. दरम्यान राजस्थान ( Rajsthan) मध्ये एक अशीच घटना घडली आहे. आपल्या प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या मुलीवर बलात्कार ( Rape Case ) करून तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यात फेकून दिले गेले आहे. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Cricket । क्रिकेट विश्वातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
एक २० वर्षाची मुलगी आपल्या प्रियकरासोबत झालावाड जिल्ह्यातील जंगलात फिरायला गेली होती. यावेळी तिथे फारसे लोक न्हवते. हे दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बोलत होते. एवढ्यात एक गुंड त्याठिकाणी आला. त्या गुंडाने त्या मुला-मुलीचा एकत्र हातात हात घेऊन बोलतानाचा व्हिडीओ बनवला. यावेळी गुंडाने त्या मुलीच्या प्रियकरासोबत गैरवर्तन केले व व्हिडीओ डिलीट करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र मुलीच्या प्रियकराकडे पैसे न्हवते. यावेळी गुंडाने “आताच्या आता पैसे घेऊन ये नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन.” अशी धमकी दिली.
यामुळे पैसे आणण्यासाठी मुलगा नाईलाजाने शहरात गेला. परंतु, पैसे घेऊन येईपर्यंत त्याची प्रेयसी आणि तो गुंड गायब झाला होता. शोधाशोध केल्यानंतर त्याला समजले की, आपली प्रेयसी जवळच्याच एका रोडवर अर्धमेल्या अवस्थेत पडली आहे. दरम्यान तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी अधिक तपास करता लक्षात आले की त्या गुंडाने मुलीवर बलात्कार केला असून, तिने प्रतिकार करताच तिच्यावर हल्ला केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी या आरोपीला पकडून जेरबंद केले होते. मात्र तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे.
Sharad Pawar | ठाकरे गटाकडून शरद पवारांवर गंभीर आरोप! अजित पवारांना सुद्धा फटकारले