Site icon e लोकहित | Marathi News

‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेबांचे संस्कार …”

Sheetal Mhatre reacted to 'that' viral video; Said, "Balasaheb's rites..."

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. यामुळे आता याप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आता यांनतर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल

शीतल म्हात्रे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी म्हंटल आहे की, “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार तर ७ जण गंभीर जखमी

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या रॅलीतला हा व्हिडीओ होता जो एडिट करुन अश्लील करण्यात आला होता. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप यावेळी म्हात्रे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार निम्म्या किमतीत वीज

Spread the love
Exit mobile version