
भारत विरुद्ध इंग्लंड महिला अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लिश संघाचा पराभव केला. त्याचबरोबर भारतीय महिला संघाने पहिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची महिला कर्णधार शेफाली वर्मा भावुक झाल्याचे दिसत आहे.
धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? आज लेखी युक्तीवादासाठीचा अखेरचा दिवस
शेफाली वर्माचे (Shefali Verma) काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या जबरदस्त विजयानंतर शेफाली वर्मा भावूक झाली असून तिच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहायला मिळाले.
चार हजार तलाठी भरती संदर्भात समोर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामन्यासाठी कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी दिली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 68 धावांवर बाद झाला.