
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत (movie) कलाकारांना माधन वेळेवर न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. तसचे सेटवर चांगली वागणूक न मिळाल्यामुळे तक्रारी देखील ते करत आहेत. याच कारणांमुळे अनेक कलाकारांनी त्यांचे प्रोजेक्ट अर्धवट सोडले आहे. तसेच काही निर्माते (producer) आणि दिग्दर्शक कलाकारांनी काम व्यवस्थित न केल्यास त्यांना कामावरून काढून टाकतात. त्यामुळे कलाकारांच्या (artist) आयुष्य अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis) लवकरच एक नियमावली जारी करणार आहे.
एलोन मस्क यांचे ट्विट चर्चेत; कुत्र्याचे फोटो टाकत माजी सीईओंना डिवचले
बाॅलीवूड इंडस्ट्रीत अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले जात नाही, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. निर्णय लागू झाल्यानंतर कलाकारांना व कामगारांना वेतन कायद्यानुसार देणे बंधनकारक असेल. ते न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश सरकारकडून दिला जाणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; महेश आहेर मारहाण प्रकरणी पोलिस
दुसरीकडे, कलाकारांनी किंवा कामगारांनी कोणतीही अधिसूचना न देता काम बंद केल्यास त्याला कोणीही जबाबदारी राहणार नाही. महत्वाची बाब म्हणजे कलाकार आणि कामगारांना कोणतीही समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. या पोर्टलवर चित्रपट सृष्टीत उपलब्ध असलेल्या कामांची माहिती सर्वांना मिळणार आहे.
शिंदे व भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा! पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
दरम्यान, महिला कलाकार यांंना सिनेसृष्टीत काम करत असताना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे नियम करून ते नियंत्रण आणायला हवेत, अशी मागणी चित्रपट कलाकार, कर्मचारी आणि निर्मात्यांकडून शिंदे फडणवीस सरकारकडे करण्यात येत होती.