राज्यात सध्या शिंदे गट व भाजपचे सरकार आहे. मात्र अहमदनगर (Ahmadnagar) मधील एका कार्यक्रमात या दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला आहे. चक्क लग्नसमारंभामध्ये दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना भिडले. हे वाद इतके वाढले की शेवटी पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
‘तारक मेहता..’मधील जेठालालने दयाबेनविषयी अखेर सोडलं मौन म्हणाले…
नगर तालुक्यातील एका गावात राजकीय नेत्याच्या लग्न समारंभाला विविध नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि बाळासाहेबांचे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचे पुत्र ओंकार सातपुते हे उपस्थित होते. तेथे त्यांच्यात वाद झाला.
गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांनी घाण आणि नीच राजकारण…”
यावेळी कर्डिले गटाच्या संतप्त समर्थकांनी वाहनातून नगर शहरातील केडगाव गाठून दिलीप सातपुते यांच्या हॉटेल रंगोलीवर दगडफेक केली. दरम्यान सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी शांत न राहता प्रत्युत्तर दिले. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सातपुते यांच्या समर्थकांनी म्हणजेच शिंदे गटाने नगर-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
वादात झालेल्या दगडफेकीत हॉटेलचे व इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके दाखल झाले.