मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर वाद सुरू आहे. शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे व शिंदे गटातील वाद सध्या अगदी टोकाला गेले आहेत. अशातच मागील तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सत्ता संघर्षावर युक्तिवाद सुरू आहे. अखेर आज यावर निकाल देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाने केलेल्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज निर्णय होणार आहे. १०:३० वाजेच्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल. आता या निकालाकडे संपूर्ण राज्याचे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.
अजित पवारांनी भाजपच्या बड्या मंत्र्याला दिला इशारा; म्हणाले, “पुण्यात असले खपवून घेतले…”
नबम राबिया ( Nabam Rabiya) प्रकरणात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने निकाल दिला होता. मात्र या निकालानुसार विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय़ अध्यक्ष घेऊ शकत नाही. यामुळे याबाबत पुनर्विचार करण्यासाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तीन दिवसांच्या युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवण्यात आला असून आज याबाबत निर्णय होणार आहे.
मोठी बातमी! पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी तरुणीला अटक
दरम्यान मागील तीन दिवसांच्या युक्तिवादात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला एक नवे वळण मिळाले आहे. यामुळे नबम रेबिया प्रकरणावर समीक्षा झाल्यानंतरच अपात्र आमदारांचा मुद्दा न्यायालयात घेतला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेसाठीच 8 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाला नवे वळण! आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार