शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी पुढे सरसावले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच बार्शी येथे झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यात लवकरच नैसर्गिक शेतीचे मॉडेल आणणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील यावेळी फडणवीस यांनी जाहीर केला.
धक्कादायक! बिबट्याने जागीच ठार केले शेतकऱ्याला; वाचा सविस्तर
गुजरातमधील नैसर्गिक शेतीच्या मॉडेल मुळे तिथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारचे नैसर्गिक शेतीचे मॉडेल लवकरच राबविण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे त्यांना नफा फार कमी प्रमाणात मिळतोय. यासाठी या ‘नैसर्गिक शेतीच्या मॉडेल चा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांचा नफा वाढेल’,असे मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
आलिया-रणबीर झाले आई-बाबा, छोट्या चिमुकलीचं आगमन
शेती आणि पाणी हे दोन्ही विषय शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रधान्यक्रमाचे विषय असतील असे सांगत फडणवीस यांनी ” राज्यातील नवीन सरकार हे शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या, सामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करणारे आहे. मागच्या 3 महिन्यांत सरकारने 7,000 कोटींची मदत शेतकर्यांना केली आहे. आता एनडीआरएफ निकषांपेक्षा दुप्पट आणि 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे.” अशी माहिती दिली.
पठ्ठयाने युट्युबवर व्हिडिओ पाहून सुरू केला ‘हा’ व्यवसाय; कमावतोय लाखो रुपये