मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही त्यामुळे सत्तापेच कायम आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं वक्तव्य अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलय. बोदवड येतील संवाद यात्रेमध्ये बोलताना मिटकरींनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
Nilesh Lanke: “…..त्याच्याचमागे देखील ईडी लागत आहे”, आमदार निलेश लंकेंचा भाजपवर घणाघात
“ सुप्रीम कोर्टाचा निकाल ज्या दिवशी लागेल, त्या दिवशी १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते,” असा दावाही मिटकरींनी केलाय.
Bhaskar Jadhav: “…. अन्यथा तुमची राख रांगोळी होईल”, भास्कर जाधवांनी शिंदे गटाला दिला इशारा
दरम्यान अमोल मिटकरींनी सवांद यात्रदरम्यानचे फोटो ट्विटरवर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतुन आयोजित परिसंवाद यात्रेस आज शेलवड ता. बोदवड जि.जळगाव येथे उपस्थिती दर्शविली .यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Urvashi-Rishabh: उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतमधील वादाला फुटले तोंड, पोस्ट चर्चेत