शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!

Shinde-Fadnavis government will collapse? Big secret explosion of 'this' big leader!

राज्यात अतिशय वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना एक नवीन माहिती समोर आली आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचा दावा एका बड्या नेत्याने केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेतकरी घरातील मुलाचे गौतमी पाटीलला थेट पत्र; म्हणाला, “लग्न करा म्हणायची वेळ…”

सत्ताधारी पक्षाकडून दबाव तंत्राचा वापर करून जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP) फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच तुम्ही तारीख आणि वार लिहुन ठेवा आता, शिंदे-फडणवीस सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे राज्यात सरकार बदलाच्या चर्चांना आणखी बळ आले आहे.

“Activa स्कुटीच्या पुढच्या भागामध्ये कोब्रा नागाने केले घर अन् पुढील दृश्य पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Video

राज्यातील जनता संकटात असताना शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde- Fadanvis Government) हवाई दौरे व स्वतःची पब्लिसिटी करण्यात व्यस्त आहे. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यामुळे लवकरच हे सरकार कोसळणार आहे. असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसेच अजित पवारांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय.

Atik Ahmed Murder: पत्रकार बनून आले, गोळ्या झाडल्या, जय श्री रामाचा गजर केला अन् सरेंडरही केलं

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *