शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांत लागणार

Shinde-Fadnavis government will collapse? The power struggle will be decided in just a few days

शिंदे गट आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल ( Sttasanghrsh Result) लवकरच लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. यामुळे त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान येत्या १०,११,१२ या तारखांना सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

Government Schemes | राज्यातील शेतकऱ्यांसाठी डबल धमाका! आता ‘या’ योजनेतून सुद्धा मिळणार सहा हजार रुपये

तसेच येत्या १५ तारखेला घटनापीठातील ५ न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती एम.आर.शाह निवृत्त होत आहेत. त्यानंतर कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. यामुळे न्यायमूर्ती एम.आर.शाह निवृत्त होण्यअगोदर सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, हे निश्चित आहे. दरम्यान हा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील ( Maharashtra) राजकीय स्थिती काय असणार यावर देखील विविध अंदाज बांधले जात आहेत.

धक्कादायक! नवविवाहित जोडपे रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले; मात्र त्यांनतर असं घडलं की दोघेही…

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाले तरी भाजप-शिंदे गटाकडे विधानसभेतील बहुमत असणार आहे. मात्र ही बाजू भक्कम असली तरी त्यात शिंदेंचे आमदार पद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे अपात्र झाले तर शिंदे- फडणवीस सरकार कोसळू शकते. त्यानंतर बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले जाईल. मात्र नवीन मुख्यमंत्री कोण असेल ? याबाबतचा निर्णय भाजपचा असणार आहे.

प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेली मात्र तरुणीसोबत त्याने केले नको ते कृत्य! जंगलामध्ये अर्धनग्न अवस्थेत पळताना…,वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *