
शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने (State Govt) ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. मात्र जे शेतकरी (Farmer) नियमित कर्जफेड करत आहेत त्यांचं शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
ब्रेकिंग! पुण्यामधील जुन्या बाजारात भीषण आग
मागच्या काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Farmer Debt Relief Scheme) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, आज अखेर या योजनेसाठी 700 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.
कोणतीही जिम न लावता रिक्षाचालक झाला बॉडी बिल्डर! बॉडी बघून तुम्हीही व्हाल थक्क
जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपया पर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या तिजोरीवर देखील याचा अतिरिक्त भर पडणार आहे. जवळपास ४ हजार ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.
बारामती-मुंबई रेल्वे सुरू होणार? सुप्रिया सुळे यांचे आश्वासन
२०१७-१८,२०१८-१९ आणि २०२९-२० या तीन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राज ठाकरेंना आज कोर्टात हजर रहावे लागणार; अजामीनपात्र वॉरंट जारी!