Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे 2 तास बैठक, ‘या’ विषयांवर चर्चा

Shinde-Fadnavis meeting late at night for almost 2 hours, discussing 'these' issues

मुंबई : रविवारी रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची महत्त्वाची बैठक (meeting) पार पडली.ही बैठक तब्बल दीड ते पावणे दोन तास चालू होती. दरम्यान या बैठकीत गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी (prabha Devi area)परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेला वाद (dispute), राज्यातील कायदा-सुव्यवस्था तसेच पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांचा विषयावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय असलेल्या 12 आमदारांच्या यादीबाबतही यावेळी चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. तसेच या बैठकीनंतर पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maheep Kapoor: “लग्नानंतरही संजय कपूरने…”, महीप कपूरचा खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा!

मुंबई पोलिसांच्या बदल्या

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या बदल्या करणं अवघड होईल. म्हणून बदल्यांचा हा प्रश्न लवकरच मार्गी लागतील अस या बैठकीतून समजते. मागील अनेक वर्षांपासून मुंबईवर उद्धव ठाकरेंचं आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता शिंदे गट मुंबई पोलिसांच्या बदल्या कशाप्रकारे अधिकारी नियुक्ती करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्तीबाबत अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

प्रभादेवीतील शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

शनिवारी शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांदरम्यान दादर येथे गणेशविसर्जनावेळी वाद झाला. या वादामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.दरम्यान असून त्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुखाला मारहाण केली. या वेळी झालेल्या वादानंतर सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या राड्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस भेटीत चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता सरकारकडून 10 म्हशींची डेअरी खोलण्यासाठी मिळणार 7 लाखांचे कर्ज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *