Site icon e लोकहित | Marathi News

शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र येणार? राज्यात नव्या युतीची नांदी! चर्चाना उधाण

Shinde-Fadnavis-Thakrey will come together? The beginning of a new alliance in the state! Discuss

राज्यात दिवसागणिक राजकीय चढउतार होताना पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करून शिंदे गट स्थापन केला. यानंतर राज्यात भाजप व शिंदे गटाची युती होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. आता मात्र आणखी एका नव्या युतीच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या आहेत. सध्याची राजकिय परिस्थिती पाहता, ‘मनसे-शिंदे गट-भाजप’ हे नवं त्रिकुट एकत्र येत की काय? अशी शंका जोर धरू लागली आहे.

वासुदेव नाना काळे यांची लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत लोकसभांच्या “क्लस्टर सहप्रभारी” म्हणून निवड!

अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे, राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस ( Eknath shinde, Raj Thackeray, Devendra Fadanvis) यांच्या भेटींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली आहे. शिंदे, ठाकरे व फडणवीस यांची आजची भेट राजकीय नसली तरी हा नव्या युतीचा संकेत आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बारामती तालुक्यात वीजवाहक तारांच्या घर्षणाने साडेतीन एकर ऊस जळाला

मागच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांनी सण-समारंभानिमित्त एकमेकांच्या भेटी घेतल्या आहेत. तसेच विविध कार्यक्रमांमध्ये देखील ते भेटत असतात. महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या लॉंचिंग वेळी देखील ते एकत्र दिसले होते. प्रशांत दामले( Prashant Damle) यांच्या नाटकाच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगाला सुद्धा एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांसाठीच; राज्यात लवकरच नैसर्गिक शेतीचे मॉडेल येणार!

Spread the love
Exit mobile version